भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघीं च तीर्थे घडलीं एकवेळा । चंद्रभागा डोळां देखिलिया

avaghin cha tirthe ghadalin ekavela | chandrabhaga dolan dekhiliya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघीं च तीर्थे घडलीं एकवेळा । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥१॥ अवघीं च पापें गेलीं दिगांतरीं । वैकुंठ पंढरी देखिलिया ॥ध्रु.॥ अवघिया संतां एकवेळा भेटी । पुंडलीक दृष्टी देखिलिया ॥२॥ तुका म्हणे जन्मा आल्याचें सार्थक । विठ्ठल चि एक देखिलिया ॥३॥