भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघी मिथ्या आटी । राम नाहीं तंव कंठीं

avaghi mithya ati | ram nahin tanv kanthin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघी मिथ्या आटी । राम नाहीं तंव कंठीं ॥१॥ सावधान सावधान । उगवीं संकल्पीं हें मन ॥ध्रु.॥ सांडिलें तें मांडे। आग्रह उरल्या काळें दंडे ॥२॥ तुका म्हणे आलें भागा । देउनि चिंतीं पांडुरंगा ॥३॥