भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघे देव साध । परी या अवगुणांचा बाध

avaghe dev sadh | pari ya avagunancha badh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघे देव साध । परी या अवगुणांचा बाध ॥१॥ म्हणउनी नव्हे सरी । राहे एका एक दुरी ॥ध्रु.॥ ऊंस कांदा एक आळां । स्वाद गोडीचा निराळा ॥२॥ तुका म्हणे नव्हे सरी । विष अमृताची परी ॥३॥