भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडीभोजन प्रकार परवडी । भिन्नाभिन्न गोडी एक रसा

avadibhojan prakar paravadi | bhinnabhinna godi ek rasa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडीभोजन प्रकार परवडी । भिन्नाभिन्न गोडी एक रसा ॥१॥ भोगित्या पंगती लाधलों प्रसाद । तिंहीं नाहीं भेद राखियेला ॥ध्रु.॥ पाकसिद्धि स्वहस्तकें विनियोग । आवडीचे भाग सिद्ध केले ॥२॥ तुका म्हणे आला उच्छिष्ट प्रसाद । तेणें हा आनंद माझ्या जीवा ॥३॥