भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडी न पुरे मायबापापासीं । घडों का येविसीं सकईंल

avadi na pure mayabapapasin | ghadon ka yevisin sakainl

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडी न पुरे मायबापापासीं । घडों का येविसीं सकईंल ॥१॥ होईंल नेमलें आपुलिया काळें । आलीयाचें बळें आग्रहो उरे ॥ध्रु.॥ जाणविलें तेथे थोडें एक वेळा । सकळ ही कळा सर्वोत्तमीं ॥२॥ तुका म्हणे निवेदिलें गुह्य गुज । आतां तुझी तुज सकळ चिंता ॥३॥