भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडी धरूनि करूं गेलों लाड । भक्तिप्रेमकोड न पुरे चि

avadi dharuni karun gelon lad | bhaktipremakod na pure chi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडी धरूनि करूं गेलों लाड । भक्तिप्रेमकोड न पुरे चि ॥१॥ म्हणऊनि जीव ठेला असावोनि । खेद होतो मनीं बहुसाल ॥ध्रु.॥ वेठीऐसें वाटे निर्फळ कारण । शीतळ होऊन खोडावलों ॥२॥ तुका म्हणे सरतें नव्हेंचि पायांपें । बळ केलें पापें नव्हें भेटी ॥३॥