भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडेल तैसें तुज आळवीन । वाटे समाधान जीवा तैसें

avadel taisen tuj alavin | vate samadhan jiva taisen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडेल तैसें तुज आळवीन । वाटे समाधान जीवा तैसें ॥१॥ नाहीं येथें कांहीं लौकिकाची चाड । तुजविण गोड देवराया ॥ध्रु.॥ पुरवीं मनोरथ अंतरींचें आर्त । धायेवरी गीत गाई तुझे ॥२॥ तुका म्हणे लेंकी आळवी माहेरा । गाऊं या संसारा तुज तैसें ॥३॥