भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडे सकळां मिष्टान्न । रोग्या विषा त्यासमान

avade sakalan mishtanna | rogya visha tyasaman

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडे सकळां मिष्टान्न । रोग्या विषा त्यासमान ॥१॥ काय तया एका साठी । कामे केली अवघी खोटी ॥ध्रु.॥ दर्पण नलगें एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥२॥ तुका म्हणे खळा । उपदेशाचा कांटाळा ॥३॥