भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां पुढें मना । चाली जाली नारायणा

atan pudhen mana | chali jali narayana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां पुढें मना । चाली जाली नारायणा ॥१॥ येथें राहिलें राहिलें । कैसें गुंतोनि उगलें ॥ध्रु.॥ भोवतें भोंवनी । आलियांची जाली धणी ॥२॥ तुका म्हणे रंगे । रंगी रंगलो श्रीपांडुरंगे ॥३॥