भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां पुढें धरीं । माझे आठव वैखरी

atan pudhen dharin | majhe athav vaikhari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां पुढें धरीं । माझे आठव वैखरी ॥१॥ नको बडबडूं भांडे । कांहीं वाउगें तें रांडें ॥ध्रु.॥ विठ्ठल विठ्ठल । ऐसे सांडुनियां बोल ॥२॥ तुका म्हणे आण । तुज स्वामीची हे जाण ॥३॥