भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां नये बोलों अव्हेराची मात । बाळावरी चित्त असों द्यावें

atan naye bolon avherachi mat | balavari chitta ason dyaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां नये बोलों अव्हेराची मात । बाळावरी चित्त असों द्यावें ॥१॥ तुज कां सांगणें लागे हा प्रकार । परि हें उत्तर आवडीचें ॥ध्रु.॥ न वंचीं वो कांहीं एकही प्रकार । आपणां अंतर नका मज ॥२॥ तुका म्हणे मोहो राखावा सतंत । नये पाहों अंत पांडुरंगा ॥३॥