भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां नको चुकों आपुल्या उचिता । कृपाळुवा कांता रखुमाईच्या

atan nako chukon apulya uchita | krupaluva kanta rakhumaichya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां नको चुकों आपुल्या उचिता । कृपाळुवा कांता रखुमाईच्या ॥१॥ आचरावे दोष हें आम्हां उचित । तारावे पतित तुमचें तें ॥ध्रु.॥ आह्मी तों आपुलें केलेसें जतन । घडो तुम्हांकून घडेल ते ॥२॥ तुका म्हणे विठो चतुराच्या राया । आहे ते कासया मोडों देसी ॥३॥