भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां न म्हणे मी माझें । नेघें भार कांहीं ओझें

atan na mhane mi majhen | neghen bhar kanhin ojhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां न म्हणे मी माझें । नेघें भार कांहीं ओझें ॥१॥ तूं चि तारिता मारिता । कळों आलासी निरुता ॥ध्रु.॥ अवघा तूं चि जनार्दन । संत बोलती वचन ॥२॥ तुका म्हणे काही । माझे तिळभरी नाही ॥३॥