भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां न करीं सोस । सेवीन हा ब्रम्हरस

atan na karin sos | sevin ha bramharas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां न करीं सोस । सेवीन हा ब्रम्हरस ॥१॥ सुखें सेवीन अमृत । ब्रम्हपदींचें निश्चित ॥ध्रु.॥ तुमचा निज ठेवा । आम्ही पाडियेला ठावा ॥२॥ तुका म्हणे देवराजा । आतां लपलेती वांयां ॥३॥