भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां मज तारीं । वचन हें साच करीं

atan maj tarin | vachan hen sach karin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां मज तारीं । वचन हें साच करीं ॥१॥ तुझें नाम दिनानाथ । ब्रिदावळी जगविख्यात ॥ध्रु.॥ कोण लेखी माझ्या दोषा । तुझा त्रिभुवनीं ठसा ॥२॥ वांयां जातां मज । तुका म्हणे तुम्हां लाज ॥३॥