भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां द्यावें अभयदान । जीवन ये कृपेचें

atan dyaven abhayadan | jivan ye krupechen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां द्यावें अभयदान । जीवन ये कृपेचें ॥१॥ उभारोनी बाहो देवा । हात ठेवा मस्तकीं ॥ध्रु.॥ नाभी नाभी या उत्तरें । करुणाकरें शांतवीजे ॥२॥ तुका म्हणे केली आस । तो हा दिस फळाचा ॥३॥