भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां देह अवसान । हें जतन तोंवरी

atan deh avasan | hen jatan tonvari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां देह अवसान । हें जतन तोंवरी ॥१॥ गाऊं नाचों गदारोळें । जिंकों बळें संसार ॥ध्रु.॥ या चि जीऊं अभिमानें। सेवाधनें बळकट ॥२॥ तुका म्हणे न सरें मागें । होईन लागें आगळा ॥३॥