भजनी मालिका
← भजनांकडे परत

असो खटपट । आतां वाउगे बोभाट

aso khatapat | atan vauge bobhat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
असो खटपट । आतां वाउगे बोभाट ॥१॥ परिसा हे विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥ अपराध करा । क्षमा घडले दातारा ॥२॥ तुका म्हणे वेथा । तुह्मा कळे पंढरिनाथा ॥३॥