भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशाबद्ध तो जगाचा दास । पूज्य तो उदास सर्वजना

ashabaddha to jagacha das | pujya to udas sarvajana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आशाबद्ध तो जगाचा दास । पूज्य तो उदास सर्वजना ॥१॥ आहे तें अधीन आपुले हातीं । आणिकां ठेविती काय बोला ॥ध्रु.॥ जाणतिया पाठीं लागला उपाध । नेणता तो सिद्ध भोजनासी ॥२॥ तुका म्हणे भय बांधलें गांठीं । चोर लागे पाठी दुम तया ॥३॥