भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशाबद्ध बहु असे निलाजिरें । होय म्हणें धीरें फळ टोंकें

ashabaddha bahu ase nilajiren | hoy mhanen dhiren phal tonken

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आशाबद्ध बहु असे निलाजिरें । होय म्हणें धीरें फळ टोंकें ॥१॥ कारणापें चित्त न पाहें अपमान । चित्त समाधान लाभासाठी ॥२॥ तुका म्हणे हातें लोटिलें न कळे । झांकितसें डोळे पांडुरंगा ॥३॥