भजनी मालिका
← भजनांकडे परत

आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेना

aroniyan pahe vat | katakat sosena

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेना ॥१॥ आलियांस पुसें मात । तेथें चित्त लागलें ॥ध्रु.॥ दळीं कांडीं लोकांऐसें । परि मी नसें ते ठायीं ॥२॥ तुका म्हणे येथें पिसें । तेथें तैसें असेल ॥३॥