भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुल्या माहेरा जाईन मी आतां । निरोप या संतां हातीं आला

apulya mahera jain mi atan | nirop ya santan hatin ala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुल्या माहेरा जाईन मी आतां । निरोप या संतां हातीं आला ॥१॥ सुख दुःख माझें ऐकिलें कानीं । कळवळा मनीं करुणेचा ॥ध्रु.॥ करुनी सिद्ध मूळ साउलें भातुकें । येती दिसें एकें न्यावयासी ॥२॥ त्या चि पंथें माझें लागलेंसे चित्त । वाट पाहें नित्य माहेराची ॥३॥ तुका म्हणे आतां येतील न्यावया । अंगें आपुलिया मायबाप ॥४॥