भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची

apuliya balen nahin mi bolat | sakha krupavant vacha tyachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥१॥ साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ध्रु.॥ काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥२॥ तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । वागवी पांगुळा पायांविण ॥३॥