भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुला तो देह आम्हां उपेक्षीत । कोठें जाऊं हित सांगों कोणा

apula to deh amhan upekshit | kothen jaun hit sangon kona

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुला तो देह आम्हां उपेक्षीत । कोठें जाऊं हित सांगों कोणा ॥१॥ कोण नाहीं दक्ष करितां संसार । आह्मीं हा विचार वमन केला ॥ध्रु.॥ नाहीं या धरीत जीवित्वाची चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥२॥ तुका म्हणे असों चिंतोनियां देवा । मी माझें हा हेवा सारूनियां ॥३॥