भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपण काय सादर । विशीं आम्हां कां निष्ठुर

apan kay sadar | vishin amhan kan nishthur

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपण काय सादर । विशीं आम्हां कां निष्ठुर ॥१॥ केलें भक्त तैसें देई । तुझें प्रेम माझ्याठायीं ॥ध्रु.॥ काय पंगतीस कोंडा । एकांतासी साकरमांडा ॥२॥ काय एकपण । पोतां घालूनि गांठी खूण ॥३॥ काय घ्यावें ऐसें । त्या आपण अनारिसें ॥४॥ तुका म्हणे मधी । आता तोडू भेद बुद्धी ॥५॥