भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपण चाळक बुद्धीच्या संचारा । आम्हांसी वेव्हारा पात्र केलें

apan chalak buddhichya sanchara | amhansi vevhara patra kelen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपण चाळक बुद्धीच्या संचारा । आम्हांसी वेव्हारा पात्र केलें ॥१॥ काय झालें तरी नेघा तुम्हीं भार । आणीक कोणां थोर म्हणों सांगा ॥ध्रु.॥ पंच भूतें तंव कर्माच्या या मोटा । येथें खरा खोटा कोण भाव ॥२॥ तुका म्हणे नाहीं बोलावया जागा । कां देवा वाउगा श्रम करूं ॥३॥