भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे

apala to ek dev karuni ghyava | tenenvin jiva sukh navhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥१॥ येर तीं माइकें दुःखाचीं जनितीं । नाहीं आदिअंतीं अवसानी ॥ध्रु.॥ अविनाश करी आपुलिया ऐसें । लावीं मना पिसें गोविंदाच्या ॥२॥ तुका म्हणे एका मरणें चि सरें । उत्तम चि उरे कीर्ती मागें ॥३॥