भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुभवें कळो येते पांडुरंगा । रुसावे ते कां गा तुम्हांवरी

anubhaven kalo yete panduranga | rusave te kan ga tumhanvari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनुभवें कळो येते पांडुरंगा । रुसावे ते कां गा तुम्हांवरी ॥१॥ आवरीता चित्त नावरे दुर्जन । घात करी मन माझे मज ॥२॥ अंतरी संसार भक्ति बाह्यात्कार ।म्हणोनी अंतर तुझ्या पायी ॥३॥ तुका म्हणे काय नेणें वर्म । आले तैसे कर्म सोसुं पुढे ॥४॥