भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुभवावांचून सोंग संपादणें । नव्हे हें करणें स्वहिताचें

anubhavavanchun song sampadanen | navhe hen karanen svahitachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनुभवावांचून सोंग संपादणें । नव्हे हें करणें स्वहिताचें॥१॥ तैसा नको भुलों बाहिरल्या रंगें । स्वहित तें चि वेगें करूनि घेई ॥ध्रु.॥ बहुरूपी रूपें नटला नारायण । सोंग संपादून जैसा तैसा ॥२॥ पाषाणाचें नाव ठेविलें देव । आणिका तारी भाव परि तो तैसा ॥३॥ कनक झाड ह्म‍ वंदिलें माथां । परिं तें अर्था न मिळे माजी ॥४॥ तुका म्हणे त्याचा भाव तारी त्यास । अहंभावीं नाश तोचि पावे ॥५॥