भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुभवाचे रस देऊं आर्त भूतां । सोडूं चोजवितां पुढें पोतीं

anubhavache ras deun arta bhutan | sodun chojavitan pudhen potin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनुभवाचे रस देऊं आर्त भूतां । सोडूं चोजवितां पुढें पोतीं ॥१॥ देवाचा प्रसाद रत्नाच्या ओवणी । शोभतील गुणीं आपुलिया ॥ध्रु.॥ आधीं भाव सार शुद्ध ते भूमिका । बीज आणि पिका चिंता नाहीं ॥२॥ तुका म्हणे ज्याचें नाम गुणवंत । तें नाहीं लागत पसरावें ॥३॥