भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंतरूप देव अनंत आपण

anantarup dev anant apan

अनंतरूप देव अनंत आपण । अंतर्बाह्यखुण योगीयांसी ॥ १ ॥ तो हा हरिमाये गोकुळीं अवतार । गोपीसंगें श्रीधर खेळतुसे ॥ २ ॥ शास्त्रांसि नाकळे श्रुति ही बरळे । तें गोपवेषें खेळे गोपाळांमाजी ॥ ३ ॥ निवृत्तिचें सार गयनीविचार । ब्रह्मचराचरमाजि वसे ॥ ४ ॥