भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंतां जीवांचीं तोडिलीं बंधनें । मज काळें येणें कृपा कीजे

anantan jivanchin todilin bandhanen | maj kalen yenen krupa kije

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनंतां जीवांचीं तोडिलीं बंधनें । मज काळें येणें कृपा कीजे ॥१॥ अनंत पवाडे तुझे विश्वंभरा । भक्तकरुणाकरा नारायणा ॥ध्रु.॥ अंतरींचें कळों देई गुह्य गुज । अंतरीं तें बीज राखेन मी ॥२॥ समदृष्टी तुझे पाहेन पाउलें । धरीन संचले हृदयांत ॥३॥ तेणें या चित्ताची राहील तळमळ । होतील शीतळ सकळ गात्रें ॥४॥ तुका म्हणे शांति करील प्रवेश । मग नव्हे नाश अखंड तो ॥५॥