भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुच्या बापाचें ठेवणें

amuchya bapachen thevanen

आमुच्या बापाचें ठेवणें । कां तूं न देसी आम्हां कारणें ॥१॥ कैसी तुझी नीत बरी । मागतां शिणलों मी हरी ॥२॥ वाउग्या येरझारा । किती कराव्या दातारा ॥३॥ कर्ममेळा म्हणे हरी । किती मागावें निर्धांरी ॥४॥