भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता

amuchi krupalu tun hosi mauli | viththale sauli sharanagata

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥१॥ प्रेमपान्हा स्तनीं सदा सर्वकाळ । दृष्टि हे निर्मळ अमृताची ॥ध्रु.॥ भूक तहान दुःख वाटों नेदीं सीण । अंतरींचा गुण जाणोनियां ॥२॥ आशा तृष्णा माया चिंता दवडीं दुरी । ठाव आम्हां करीं खेळावया ॥३॥ तुका म्हणे लावीं संताचा सांगात । तेथें न पवे हात किळकाळाचा ॥४॥