भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुची केली हीन याती

amuchi keli hin yati

आमुची केली हीन याती । तुज कां न कळे श्रीपती ॥१॥ जन्म गेला उष्टे खातां । लाज न ये तुमचे चित्ता ॥२॥ आमचे घरीं भात दहीं । खावोनी कैसा म्हणसी नाहीं ॥३॥ म्हणे चोखियाचा कर्ममेळा । कासया जन्म दिला मला ॥४॥