भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमृताचीं फळें अमृताची वेली । ते चि पुढें चाली बीजाची ही

amrutachin phalen amrutachi veli | te chi pudhen chali bijachi hi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अमृताचीं फळें अमृताची वेली । ते चि पुढें चाली बीजाची ही ॥१॥ ऐसियांचा संग देई नारायणा । वोलाचा वचना जयांचिया ॥ध्रु.॥ उत्तम सेवन सितळ कंठासी । पुष्ट कांती तैसी दिसे वरी ॥२॥ तुका म्हणे तैसें होइजेत संगें । वास लागे अंगें चंदनाच्या ॥३॥