भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमृताची धार । वाहे देवा ही समोर

amrutachi dhar | vahe deva hi samor

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अमृताची धार । वाहे देवा ही समोर ॥१॥ उर्ध्ववाहिनी हरीकथा । मुगुटमणि सकळां तीर्थां ॥ध्रु.॥ शिवाचें जीवन । जाळी महादोष कीर्तन ॥२॥ तुका म्हणे हरी । इची स्तुति वाणी थोरी ॥३॥