भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमृत अव्हेरें उचंबळलें आतां । विष आर्त भूतां आवश्यक

amrut avheren uchambalalen atan | vish arta bhutan avashyak

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अमृत अव्हेरें उचंबळलें आतां । विष आर्त भूतां आवश्यक ॥१॥ आदरासी मोल नये लावूं केजें । धीर शुद्धबीजें गोमटा तो ॥ध्रु.॥ खऱ्याचिये अंगीं आपणे चाली । लावणी लाविली काय लागे ॥२॥ तुका म्हणे चाडे करा वेवसाव । आम्हांसी तो वाव धीर आहे ॥३॥