भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही नरका जातां काय येईल तुझ्या हाता । ऐसा तूं अनंता विचारीं पां

amhi naraka jatan kay yeil tujhya hata | aisa tun ananta vicharin pan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही नरका जातां काय येईल तुझ्या हाता । ऐसा तूं अनंता विचारीं पां ॥१॥ तुज शरण आलियाचें काय हें चि फळ । विचारा दयाळ कृपानिधी ॥ध्रु.॥ तुझें पावनपण न चले आम्हांसीं । ऐसें हृषीकेशी कळों आलें ॥२॥ आम्ही दुःख पावों जन्ममरण वेथा । काय तुझ्या हाता येत असे ॥३॥ तुका म्हणे तुम्ही खादली हो रडी । आम्ही धरली सेंडी नाम तुझें ॥४॥