भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही नाचों तेणें सुखें । वाऊं टाळी गातों मुखें

amhi nachon tenen sukhen | vaun tali gaton mukhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही नाचों तेणें सुखें । वाऊं टाळी गातों मुखें॥१॥ देव कृपेचा कोंवळा । शरणागता पाळी लळा ॥ध्रु.॥ आम्हां जाला हा निर्धार । मागें तारिलें अपार ॥२॥ तुका म्हणे संतीं । वर्म दिलें आम्हां हातीं ॥३॥