भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही क्षेत्रींचे संन्यासी । देहभरित हृषीकेशी । नाहीं केली ऐशी । आशाकामबोहरी

amhi kshetrinche sannyasi | dehabharit hrushikeshi | nahin keli aishi | ashakamabohari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही क्षेत्रींचे संन्यासी । देहभरित हृषीकेशी । नाहीं केली ऐशी । आशाकामबोहरी ॥१॥ आलें अयाचित अंगा । सहज तें आम्हां भागा । दाता पांडुरंगा । ऐसा करितां निंश्चिती ॥ध्रु.॥ दंड धरिला दंडायमान । मुळीं मुंडिलें मुंडण । बंद बंदाचि कौपीन । बहिरवास औटडें ॥२॥ काळें साधियेला काळ । मन करूनि निश्चळ । लौकिकीं विटाळ । धरूनि असों ऐकांत ॥३॥ कार्यकारणाची चाली । वाचावाचत्वें नेमिली । एका नेमें केली । स्वरूपींच वोळखी ॥४॥ नव्हे वेषधारी । तुका आहाच वरीवरी । आहे तैसीं बरीं । खंडें निवडि वेदांची ॥५॥