भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही ज्याचे दास । त्याचा पंढरिये वास

amhi jyache das | tyacha pandhariye vas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही ज्याचे दास । त्याचा पंढरिये वास ॥१॥ तो हा देवांचा ही देव । काय कळिकाळाचा भेव ॥ध्रु.॥ वेद जया गाती। श्रुति म्हणती नेति नेति ॥२॥ तुका म्हणे निज । रूपडें हें तत्त्वबीज ॥३॥