भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही जालों एकविध । सुद्या सुदें असावें

amhi jalon ekavidh | sudya suden asaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही जालों एकविध । सुद्या सुदें असावें ॥१॥ यावरी तुमचा मोळा । तो गोपाळा अकळ ॥ध्रु.॥ घेतलें तें उसणें द्यावें । कांहीं भावें विशेषें ॥२॥ तुका म्हणे क्रियानष्ट । तरी कष्ट घेतसां ॥३॥