भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही आळीकरें । प्रेमसुखाचीं लेंकुरें

amhi alikaren | premasukhachin lenkuren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही आळीकरें । प्रेमसुखाचीं लेंकुरें ॥१॥ पायीं गोविली वासना । तुच्छ केलें ब्रम्हज्ञाना ॥ध्रु.॥ येतां पाहें मुळा । वास पंढरीच्या डोळां ॥२॥ तुका म्हणे स्थळ । मग मी पाहेन सकळ ॥३॥