भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां वैष्णवांचा कुळधर्म कुळींचा । विश्वास नामाचा एका भावें

amhan vaishnavancha kuladharma kulincha | vishvas namacha eka bhaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां वैष्णवांचा कुळधर्म कुळींचा । विश्वास नामाचा एका भावें ॥१॥ तरीच हरीदास म्हणवितां श्लाघीजे । निर्वासना कीजे चित्त आधी ॥ध्रु.॥ गाऊं नाचूं प्रेमें आनंदें कीर्तनीं । भक्ति मुक्ति दोन्ही न मगों तुज ॥२॥ सगुण निर्गुण एकची आवडी । चित्ते दिली बुडी चिदानंदी ॥३॥ वृत्तिसहित मन रिघे प्रेम डोही । नाठविती देही देहभाव ॥४॥ तुका म्हणे देवा ऐसीयांची सेवा । द्यावी जी केशवा जन्मोजन्मीं ॥५॥