भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां सकळा हें । तुझ्या नामाचें चि बळ

amhan sakala hen | tujhya namachen chi bal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां सकळा हें । तुझ्या नामाचें चि बळ ॥१॥ करूं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ध्रु.॥ जयाचा जो भोग । सुख दुःख पीडी रोग ॥२॥ तुका म्हणे देवा । तुझे पायीं माझा हेवा ॥३॥ आम्हांसी सकळ । तुझ्या नामाचेंची बळ ॥१॥ करू अमृताचें पान । दुजें नेणो काही आन ॥ध्रु॥ जयाचा जो भोग। सुख दुःख पीडा रोग ॥२॥ तुका म्हणे देवा । तुझे पायी माझा ठेवा ॥३॥