भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां लडिवाळांचे बोल । करा कवतुकें नवल

amhan ladivalanche bol | kara kavatuken naval

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां लडिवाळांचे बोल । करा कवतुकें नवल ॥१॥ करूं स्तुती तरि ते निंदा । तुम्ही जाणां हे गोविंदा ॥ध्रु.॥ बोबड्या उत्तरीं । तुह्मा रंजवितों हरी ॥२॥ मागतों भातुकें । तुका म्हणे कवतुकें ॥३॥