भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां हरीच्या दासां कांहीं । भय नाहीं त्रयलोकीं

amhan harichya dasan kanhin | bhay nahin trayalokin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां हरीच्या दासां कांहीं । भय नाहीं त्रयलोकीं ॥१॥ देव उभा मागेंपुढें । उगवी कोडें संकट ॥ध्रु.॥ जैसा केला तैसा होय। धांवे सोय धरोनि ॥२॥ तुका म्हणे असों सुखें । गाऊं मुखें विठोबा ॥३॥