भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हांपाशीं सरे एक शुद्ध भाव । चतुराई जाणींव न लगे कळा

amhampashin sare ek shuddha bhav | chaturai janinv na lage kala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हांपाशीं सरे एक शुद्ध भाव । चतुराई जाणींव न लगे कळा ॥१॥ सर्वजाण माझा स्वामी पांडुरंग । तया अंगसंगें गोपाळासी ॥२॥ तुका म्हणे कर्मधर्में नये हातां । तयावरी सत्ता भाविकांची ॥३॥