भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलों उल्लंघुनि दुःखाचे पर्वत । पायांपाशीं हित तुमच्या तरी

alon ullanghuni duhkhache parvat | payampashin hit tumachya tari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आलों उल्लंघुनि दुःखाचे पर्वत । पायांपाशीं हित तुमच्या तरी ॥१॥ न देखेचि लासा दुःखी होतें मन । कठिणें कठिण वाटतसे ॥ध्रु.॥ नव्हे सांडी परि वाटतें निरास । न ये माझा दिस संकल्पाचा ॥२॥ तुका म्हणे तुम्हीं सदैव जी देवा । माझ्या हाचि जीवा एक ठाव ॥३॥